PuLa Deshpande
( 21 लेख )
पुरुषोत्तम लक्ष्मण (पु. ल.) देशपांडे (नोव्हेंबर ८, १९१९ - जून १२, २०००) हे एक उत्कृष्ट मराठी लेखक (बहुतांशी विनोदी), नाटककार, नट (रंगभूमी व चित्रपट), कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.
जीवन
मुंबईत जन्मलेले पु ल, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.
मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु. लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
उल्लेखनीय
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
पु. लं.चे १२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.
'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु. ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.
पुलंचे काही साहित्य
विनोद प्रवासवर्णन व्यक्तिचित्रे
बटाट्याची चाळ (१९५८) अपूर्वाई (१९६०) गणगोत (१९६६)
गोळाबेरीज (१९६०) पूर्वरंग (१९६३) गुण गाईन आवडी (१९७५)
असा मी असामी (१९६४) जावे त्यांच्या देशा (१९७४) व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६)