
हे मना रे, निर्भय हो । निःसंशयी हो ।
असे पाठीशी रे । प्रचंड स्वामी बळ हे ।
स्मृतगामी अतकर्य । अवधूत हे ।
अशक्य ते शक्य । करतील स्वामी हे ॥१॥
जेथे स्वामी चरण । असे उणे काय तेथे ।
भक्त प्रारब्ध । स्वये घडवी ही प्राय ।
न नेई तयाला । आज्ञेविण काळ ।
नसे भिती ही । परलोकी ही तयाला ॥२॥
भय हे पळेल । घेताच नाम स्वामींचे ।
आहे जवळी ही उभी । स्वामीच शक्ती रे ।
जन्म मृत्यू हा खेळ । असे जगी ज्यांचा ॥३॥
श्रद्धा ठेव रे । स्वामी मंत्रावरी ।
त्या विणा कसारे । होशील त्यांचा भक्त ।
देतात आपणा । सदैव तेच हात ।
देतील स्वामीच साथ । नको उगा घाबरु ॥४॥
घे हेच स्वामी तीर्थ । होय भयभय मुक्त ।
आहेत स्वामीच । या नाशीवंत देहात ॥
आठवी रे प्रचिती । घेऊनी या हे तीर्थ ।
न वंचिती तूला हे । स्वामी समर्थ ॥५॥
अनन्याश्चिंतयन्तो मां येजनः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तनां योगक्षेम वहाम्यहं ।
श्री स्वामी चरणारविदार्पणमस्तु ॥६॥
'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ''
मराठी वर्षाचा पहिला दिवस - चैत्र शुद्ध प्रतिपदा - हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारून, दाराला तोरण बांधून, गारवा देणार्या, औषधी असणार्या कडुनिंबाची कोवळी पाने गुढीसोबत बांधून गुढीची पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ, नवे कोरे कापड (साडी इत्यादी), आणि गडू-तांब्या असे त्यावर बांधून सूर्योदयाला ही बांबूची काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. सूर्यास्ताला पुन्हा पूजा करुन ती उतरवतात.
नवीन वर्षाचा हा दिवस उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असल्याने औषधी असा कोवळा कडूनिंब, मीठ, सैंधव, जिरे, मीरे, ओवा एकत्र वाटून थोडेसे खाण्याची प्रथा आहे. नवे निश्र्चय, चांगल्या सवयींची सुरुवात करून हा दिवस साजरा करतात. पूर्ण वर्ष उत्साहात जावे यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा समजला जातो.
सर्वरोगपरिहारक असा कडुनिंब वृक्ष असल्याचे आर्यभिषक या प्राचीन ग्रंथात म्हटले आहे. जंतुनाशक अशा कडुनिंबाचे महत्त्व शास्त्रीय संशोधनानेही सिद्ध केले आहे. कमी पाण्यावर राहून दहा वर्षात वाढणारी ही झाडे हवा शुद्ध राखण्यासाठी महत्त्वाची आहेत. बी, साल, पाने असे पूर्ण झाड त्याच्या औषधी गुणांमुळे महत्त्वाचे आहे. वर्षातील पहिल्या दिवशी या महत्त्वाच्या झाडाची आठवण सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून दिली आहे.
रामायणात उल्लेख आहे त्यानुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्यादिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला. म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असे म्हटले जाते. चांगली वेळ म्हणजे मुहूर्त. गुढीपाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला (गुढीपाडव्याला) वसंत ऋतूची सुरुवात होते. सृष्टीला नवजीवन देणारा हा ऋतू आहे. आपल्या वर्षाची गणना करताना पहिला उत्तम दिवस असेही या दिवसाला म्हटले आहे. ‘प्रतिपदा’ या शब्दाचा अपभ्रंश पाडवा झाला असावा. गुढीमध्ये वापरलेल्या प्रतिकांचा विशेष उल्लेख करायला हवा. बांबूला अनेक वेळा नवे बांबू तयार करण्याची निसर्गाने शक्ती दिली आहे, तरीही तो लवचीक असतो त्याप्रमाणे आपल्यात ताकद यावी. वस्त्र, खण हे मंगलमय वातावरण आणते, काठीवर किंवा बांबूवर धातूचा गडू किंवा तांब्या पालथा असतो. या धातूमुळे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाने येणार्या प्रकाशलहरी खेचून घेण्याची शक्यता वाढते असे म्हणतात.
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥
जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले । जिवा जन्मदारिद्र्य ठाकूनि आले ॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥
पुढे पाहता सर्वही कोंदलेसे । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥
अभावे कदा पुण्य गाठी पडेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥
जयाचे तया चूकले प्राप्त नाही । गुणे गोविले जाहले दुःख देही ॥
गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥
भजावा जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विनेकू ॥ १३१ ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥
हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी । जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥
नसे गर्व आंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥
धरी रे मना संगती सज्जनीची । जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥
जनांकारणे देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥
तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥
जगी धन्य तो राममूखे निवाला । कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥
देहेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥
मना वासना वासुदेवी वसो दे । मना वासना कामसंगी नसो दे ॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥
गतीकारणे संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥ १२९ ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥
महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनि तयाकारणे सिंह जाला ॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तया कारणे वामनू चक्रपाणी ॥ अहल्येसतीलागी आरण्यपंथे । कुडावा पुढे देव बंदी तयाते ॥ तये द्रौपदीकारणे लागवेगे । त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥ अनाथां दिनींकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे ॥
न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥
बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२३ ॥
कळीलागि जाला असे बौद्ध मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥
बहू शापिता कष्टला अंबऋषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥
धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे । कृपा भाकिता दीघली भेटि जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥
गजेदू महासंकटी वास पाहे । तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥
विधीकारणे जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥
जना रक्षणाकारणे नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥
हिताकारणे बोलणे सत्य आहे । हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥
हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥
जनीं सांगता ऐकता जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥
जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥
फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥
तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा ॥
जनीं बोलण्यासारखे आचरावे । क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥
दया सर्वभूती जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥
मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥
मना सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगी तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥
तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे ॥
अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥
जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥
अती लीनता सर्वभावे स्वभावे । जना सज्जनालागि संतोषवावे ॥
देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥
हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥
परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥
क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥
मना कल्पना धीट सैराट धावे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥
विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥